महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने वरळीतील बीडीडी चाळवासियांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होतेय. येथील पुनर्विकास प्रकल्पाचे कामकाज पाहण्यासाठी शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली. येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पात येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. सर्व अडचणींवर मात करीत, हा प्रकल्प नक्कीच वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.