‘शिवसंकल्प’ मेळाव्यात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रात सुरु असलेली भाजपची वळवळ गाडण्यासाठी, हातात मशाल घेण्याचा ‘शिवसंकल्प’ उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते शशिकांत सुतार, उपनेत्या सुषमाताई अंधारे, उपनेते जिल्हासंपर्कप्रमुख सचिन अहिर आणि सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.