प्लॉस्टीकच्या नऊ कारखान्यांना ठोकले सिल, शहरात एकच खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर शहरामधील केडगाव इंडिस्ट्रीजमध्ये प्लॉस्टिकचे उत्पादन तयार करण्यार्‍या नऊ कारखान्यांना महाराष्ट्र प्रदुषण कंट्रोल बोर्डाने सिल ठोकले आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करणारच असे जाहीर करताच नगर जिल्ह्यात कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत. नगर शहरामध्ये केडगाव इंडस्ट्रीजमध्ये प्लॅस्टिक उत्पादन करणार्‍या कंपन्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. शुक्रवारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, या संदर्भात मनपाचे अधिकारी किशोर देशमुख यांनी आम्ही दुपारपासूनच ही कारवाई सुरु केली असून नऊ ठिकाणी आतापर्यंत कारवाई करुन या कंपन्याना सिल ठोकले असल्याचे त्यांनी सांगितले.