देशातील 25 टक्के तरुण बेरोजगार, पीएलएफएसच्या सर्वेक्षणातून माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील 15 ते 29 वयोगटातील तरुण बेरोजगार आहेत. हे तरुण ना शिक्षणात सहभागी आहेत ना प्रशिक्षणात सहभागी आहेत, अशी माहिती आवधिक श्रम बल सर्वेक्षण (पीएलएफएस) मधून उघड झाली आहे. पीएलएफएसने केलेल्या सर्वेक्षणानुसार, शिक्षित लोकांमधील बेरोजगारीचा दर अजूनही 6.5 टक्क्यांपर्यंत आहे. युवा बेरोजगारीचा दरही जैसे थे आहे.

देशातील महिला आणि पुरुष यांना समान वेत मिळत नाही. महिलांना मिळणारे वेतन हे पुरुषांच्या वेतनाच्या सुमारे 31 टक्के कमी आहे. समान संधी असूनही महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळते. मागील वर्षभरात महिलांची सरासरी मजुरी 315 रुपये तर पुरुषाची मजुरी सरासरी 455 रुपये आहे. स्वयंरोजगारात असलेले पुरुष महिलांपेक्षा तिप्पट जास्त कमाई करत आहेत. एक महिला आपल्या कामासाठी 6 हजार 374 रुपये प्रति महिना कमवत आहेत. तर पुरुष 17 हजार 914 रुपयांची कमाई करत आहेत. सर्वेक्षणानुसार, देशाच्या श्रमशक्तीत एका वर्षात किरकोळ 0.3 टक्के वाढ झाली आहे. देशात सध्या 67.8 टक्के लोकसंख्या किमान माध्यमिक स्तरांपर्यंत शिक्षित आहे. तरीही केवळ 4.2 टक्के लोकांनाच औपचारिक तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ कौशल्य मिळवण्यात खूप मोठे अंतर आहे.