पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला अर्बन नक्षल म्हणतात पण त्यांचा पक्षच दहशतवादी आहे असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला आहे. तसेच त्यांचा पक्ष लोकांची लिंचिंग करतात असेही खरगे म्हणाले.
आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खरगे म्हणाले की, पंतप्रधान मोदी पुढारलेल्या विचारांना अर्बन नक्षल म्हणतात ही त्यांची सवय आहे. पण त्यांचा पक्षच दहशतवादी पक्ष आहे. ते लोकांना मारहाण करतात आणि लोकांची लिंचिंग करतात. आदिवासी महिलांवर बलात्कार करतात आणि अशा लोकांना ते पाठिंबा देतात आणि इतरांना दोष देतात. यावर पंतप्रधान मोदींना बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. जिथे भाजपचं राज्य आहे तिथे अनुसूचित जाती आणि आदिवासी जनतेवर अत्याचार होता. तुमचं सरकार आहे आणि तुम्ही या घटना रोखायला हव्या असेही खरगे म्हणाले.
#WATCH | On PM Modi’s remark that Congress has been taken over by Urban Naxals, Congress chief Mallikarjun Kharge says, ” Progressive people are being called Urban Naxals…this is his habit. His party itself is a terrorist party. They do lynching, hit people, urinate in the… pic.twitter.com/hACBNLE6T8
— ANI (@ANI) October 12, 2024