पंतप्रधान मोदींचा अचानक मेट्रो प्रवास; लोक भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अचानक मेट्रोमध्ये एंट्री केली आणि दिल्ली विद्यापीठापर्यंत प्रवास केला. यामुळे लोक भडकले असून, सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘हा तर पीआर स्टंट आहे, ऑफिसच्या वेळी प्रवाशांची कोंडी झाली,’ अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या.

दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याचा समारोप शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी पंतप्रधान मोदी लोककल्याण मार्ग मेट्रो स्टेशन येथे आले. विश्वविद्यालय मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास त्यांनी केला. यावेळी मेट्रोमधील प्रवासी, विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. पंतप्रधानांचा हा प्रवास अचानक होता. मोठी सुरक्षा तैनात केली गेली.

नेटकरी संतप्त

  • आपल्या या प्रवासामुळे जनतेला त्रास झालाच असेल. आपल्या गाडीने तुम्ही जायला हवे होते.
  • याला पीआर स्टंट म्हणतात.
  • तुमच्यासाठी प्रवाशांना थांबवून मेट्रो रिकामी करावी लागली असणार. तुमच्या या स्टंटमुळे प्रवाशांची कोंडी झाली असणार.