पीएनबी बँक घोटाळा – नीरव मोदीच्या भावांना आर्थिक गुन्हेगार का घोषित करू नये? न्यायालयाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या दोन भावांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या प्रक्रियेत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विशेष न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी निशाल मोदी आणि नेहल मोदी या दोघांना नोटीस जारी केली असून त्यांना अधिकृतपणे फरार आर्थिक गुन्हेगार का घोषित करू नये, याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. पीएनबीत मोठय़ा प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून त्यात नीरव मोदी व त्याच्या सहकाऱ्यांची भूमिका असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील काही आरोपी परदेशात असल्याने तपासात अडथळे येत असून संबंधित आरोपींना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.