सुजय विखे-पाटील यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात

2362
प्रातिनिधिक फोटो

भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. गारखिंडीच्या घाटात हा अपघात झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी पदमने व इतर पोलीस कर्मचारी या अपघातात जखमी झाले आहेत. या जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला जास्त इजा झाली असून इतर 4 कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांची ही गाडी अपघात झाल्यानंतर खोल दरीत कोसळली होती. पिंपळगाव रोठा इथले रहिवासी असलेले गोपीनाथ घुले यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावले. या सगळ्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवले आणि रुग्णालयाकडे रवाना केले. तातडीने अँम्ब्युलन्सही उपलब्ध झाल्याने सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी फार वेळ लागला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या