82 निरीक्षकांना एसीपीपदी बढती

आज होईल, उद्या होईल, लवकरच होईल असे म्हणत गेल्या कित्येक दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील 82 पोलीस निरीक्षकांना अखेर आज दिलासा मिळाला. शासनाने 82 निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती दिली. गेल्या कित्येक दिवसांपासून सहाय्यक पोलीस आयुक्त पदांची बढती रखडली होती. यामुळे बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या निरीक्षकांमध्ये प्रचंड खदखद आणि अस्वस्थता होती.

काही अधिकाऱ्यांना निवृत्तीला काही तास शिल्लक असताना सहाय्यक आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. त्यामुळे आमच्या वाट्याला पण असेच येते की काय अशी खदखद अधिकाऱ्यांमध्ये होती. अखेर फायलीत अडकलेली बढती शासनाने आज जारी केली. परिणामी एसीपी व्हायच्या प्रतीक्षेत असलेल्या 82 निरीक्षकांना आज हायसे वाटले. त्यांना एकदाची एसीपीपदी बढती मिळाली. 17 अधिकाऱ्यांना एसीपीपदी बढतीवर बृहन्मुंबई पोलिस दलात नियुक्ती दाखविण्यात आली आहे.