
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी सर्वत्र ध्वजारोहणाची लगबग सुरू असतानाच जालनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपाळ चौधरी यांनी न्यायासाठी आंदोलन केले. पण एका पोलीस अधिकाऱ्याने चौधरी यांना ताब्यात घेऊन जात असताना निर्दयपणे त्यांच्या कमरेत लाथ घातली. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देवाभाऊंच्या पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. त्यानंतर पोलिसांनीही याप्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या गोपाळ चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. तक्रार करूनही पोलीस दाद देत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
जालना येथे आंदोलन करणाऱ्या एका आंदोलकाने मंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्याच्या कंबरेत लाथ घातली. pic.twitter.com/He6LKII8qD
— Saamana Online (@SaamanaOnline) August 15, 2025