
बीडमध्ये धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. बीड जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेला कर्मचारीच चोर असल्याचं समोर आलं आहे. अमित मधुकर सुतार असं या कर्मचार्याचे नाव आहे. हा कर्मचारी ऑनलाईन जुगार ड्रीम 11 आणि रम्मी अॅपसारख्या गेमध्ये पैसे गमावून बसला. काढलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क चोरीचा मार्ग स्विकारला. थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातून सुतार याने बॅटर्याही चोरल्या होत्या.
ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यानंतर काढलेले कर्ज फेडण्यासाठी अमित सुतार याने चोरीचा मार्ग पत्करला. पोलीस अधीक्षक कार्यालयातून इनर्व्हटरसाठी लागणार्या तब्बल 58 बॅटर्या चोरल्या होत्या. या प्रकरणानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी सुतार याचे निलंबन केले होते. तेव्हापासून तो जामिनावर बाहेर होता. या प्रकरणाला वर्ष उलटत नाही तोच सुतार याने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने सात दुचाकी चोरी केल्या. चोरीच्या या प्रकरणात अमित सुतार याच्यावर बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला ताब्यातही घेण्यात आले आहे.