Farmer Protest: प्रशासन घाबरलं! दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना रोखलं; अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, इंटरनेटही बंद

shambhu-border-protest

हरियाणाच्या अंबाला येथील शंभू सीमेवर नऊ महिन्यांहून अधिक काळ तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न करताना बॅरिकेड्स लोटून दिले. शेतमालाला किमान आधारभूत किंमतची (एमएसपी) कायदेशीर हमी मिळावी यासाठी ते निषेध करत आहेत. या आधी या शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता.

आंदोलनकर्ते शेतकरी जेव्हा बॅरिकेड्स हटवून दिल्लीच्या दिशेने चालू लागले तेव्हा त्यांना रोखण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला. तसेच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. प्रशासन चांगलंच घाबरलं असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अंबाला येथील इंटरनेट सेवा 9 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. दरम्यान, शेतकऱ्यांनी सरकारला कोणत्याही अडवणुकीशिवाय मोर्चा काढू देण्याची विनंती केली आहे.