
सततच्या कामाच्या तणावातून एका पोलीस शिपायाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे पोलिसाचे प्राण वाचले. राकेश सोनुने असे सदर पोलिसाचे नाव आहे. सोनुने यांच्यावर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राकेश सोनुने हे वरोरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सतत बंदोबस्त आणि अतिरिक्त कामाचा दबाव यामुळे सोनुने मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी विष प्राशन करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
सोनुने यांच्या कुटुंबीयांच्या ही बाब वेळीच लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने सोनुने सुखरुप बचावले आहेत.