रत्नेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप

215

सामना प्रतिनिधी । रामपुरी

पाथरी तालुक्यातील रामपुरी रत्नेश्वर मंदिराकडील ध्यान मंदिर व शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मागील कित्येक वर्षापासून हा रस्ता दुरुस्त न केल्यामुळे वाहनधारकांसह भाविक, विद्यार्थी, परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून भाविक, विद्यार्थी, परिसरातील शेतकरीची परवड थांबवावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरु लागली आहे.

रामपुरी गावाच्या बाहेर रत्नेश्वर मंदिर व शांताबाई नखाते विद्यालय ही शाळा आहे. हा रस्ता युती शासनाच्या काळात झाले असून शेतरस्ता सुद्धा आहे. तेव्हापासून ते आजतागायत याच रस्त्याची डागडुजी किंवा डांबरीकरण झाले नाही. सद्यस्थितीत रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. पावसाळा सुर झाल्याने थोड्याप्रमाणात रामपुरी येथे पाऊस पडल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले. या रस्त्याच्या तयार झालेल्या तळ्यामध्ये रत्नेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांची पंचायत होत आहे. रत्नेश्वराच्या दर्शनाला यावे कि नाही? असा प्रश्न भाविकांच्या मनात उपस्थित होत आहे. तसेच या भागातच शाळा असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब विद्याथ्र्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणे परवडत नाही. कशीबशी ग्रामीण भागात दहावी पर्यंतची शाळा आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे विद्याथ्र्यांना शाळेत जाण्यासाठी त्या साचलेल्या तळ्यातूनच वाट काढावी लागत आहे. तसेच हा रस्ता शेतरस्ता सुद्धा आहे. शेतकऱ्यांना सुद्धा या नादुरस्त रस्त्याचा नाहकत्रास सहन करावा लागत आहे. ढालेगाव ते रामपुरी हा रस्ता झाला आहे. रामपुरी ते वडी गावाकडे जाणारा रस्ता सुद्धा अध्र्यापर्यंत झाला आहे. रामपुरी ते तालुक्याला जाणारा जुना मुंजारस्ता सुद्धा नुकताच झाला आहे. परंतु ध्यान मंदिर मंदिर व ज्ञान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मात्र स्थानिक पुढारी, लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केला आहे. या रस्त्यावरच एक ओढा असून या ओढ्याची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. इतर रस्त्याच्या कामात विकास निधी मिळाल्याने विकासाची ढगपुâटी झाल्याचे एकिकडे बोलले जात असताना या रस्त्याचा प्रश्न मात्र प्रलंबित असल्याने या भागातील शेतकरी, भक्तगण, विद्यार्थी, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या