केंद्र शासनाच्या भुयारी गटार योजनेचे पाईप नदी पात्रात सोडण्यासाठी पाईप टाकण्यात आले आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, महिन्याभरापुर्वी तयार केलेल्या या रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यातील पांझरा नदीकिनारी असलेल्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने शिनसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खड्ड्यात उडी मारत अनोख आंदोलन करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.
पांझरा नदी किनारी नुकताच झालेल्या या डांबरीकरणाला ठिकठिकाणी दोन चार फुटाचे खड्डे पडले आहेत. नदीकिनार्यावरील एकविरा देवी मंदिरासमोरील रस्त्यांना पहिल्याच पावसात मोठे भगदाड पडले आहे. अतिशय तकलादु स्वरूपातील रस्त्यांना रंगरंगोटी करून निधी उपटण्याचे काम ठेकेदार व प्रशासनाच्या संगनमताने झालेले आहे. मजीप्राने बांधकाम विभागाला दिलेल्या या कामाचा अधिकाऱ्यांचे पहिल्यापासून दुर्लक्ष होते. यापूर्वीहीअनेक पक्षांनी या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे असे सांगितले होते. तसेच याबाबत निवेदनही दिले होते, पण त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासानाने ठेकेदाराला बिल काढण्यासाठी प्रशासनाने मदत केली.
आता पहिल्याचा पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामात कुचराई करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर ताबडतोब गुन्हा दाखल करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने( उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. यावेळी शिवसेनेने एक अनोखे आंदोलन केले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यात उडी मारून प्रशासनाचे लक्ष वेधले असून मागील पाच वर्षापासून मंद गतीने सुरू असलेल्या 156 कोटीच्या मलनिःसारण योजना गुजरातच्या पटेल नामक ठेकेदाराला दिली आहे. हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून ठेकेदारावर कोणतीच कारवाई झालेली नाही. निकृष्ट कामातून धुळेकरांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने केल्याचा आरोप होत आहे.
या आंदोलनावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे ,किरण जोंधळे धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, ललित माळी भरत मोरे , प्रवीण साळवे , कैलास मराठे कपिल लिंगायत, संदीप चौधरी, शत्रुघ्न तावडे, माहदु गवळी , आनंद जावडेकर, शिवाजी शिरसाळे ,विष्णू जावडेकर, भटु गवळी, नितीन जडे, छोटू माळी तेजस सपकाळ आदी उपस्थित होते.