
प्रतिभावंत कलावंतांचे ‘अमलगमेशन’ प्रदर्शन 16 ते 19 डिसेंबरदरम्यान सिमरोझा आर्ट गॅलरी, भुलाभाई देसाई रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये 24 कलाकारांची चित्रे व शिल्पे बघण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन अपरिमिता सप्रू यांनी केले आहे. प्रकाश बाळ जोशी, आशिफ हुसेन, गौरी वर्मा, ममता मल्होत्रा, राखी शाह, दादा साहेब यादव, मारेडू रामू, प्रमोद स्टीफन, राजश्री पतंगे, भारती शाह, मुनावर हुसेन बक्स, शालू परसरामपुरिया, नवीन अग्रवाल, राजन शाह, अलका पांडे आदीं कलाकारांचा समावेश आहे.























































