
सोशल मीडियावर तरुणीचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
अंधेरी येथे तरुणी राहते. तिचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे. दोन दिवसांपूर्वी ती घरी होती तेव्हा तिच्या भावाने तिला सोशल मीडियावरील पोस्टबाबत विचारणा केली. त्या पोस्ट पाहून तरुणीला धक्का बसला. तरुणीचे सोशल मीडिया अकाऊंट उघडले तेव्हा ते फोटो आणि व्हिडीओ तिच्या पूर्वीच्या प्रियकरासोबतचे असल्याचे तिच्या लक्षात आले. रिलेशनशिपमध्ये असताना तिने ते फोटो आणि व्हिडीओ काढले होते. त्यानंतर गेल्या वर्षी तरुणीचे ब्रेकअपदेखील झाले होते. ब्रेकअपनंतर ते दोघे एकमेकांच्या संपका&त नव्हते. घडल्याप्रकरणी तरुणीने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.