श्री प्रभादेवी मातेचा वार्षिक उत्सव 2 जानेवारीपासून

दरवर्षी पौष पौर्णिमेला होणारा प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री प्रभादेवी मातेचा वार्षिक उत्सव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच साजरा होणार आहे. शुक्रवार, 2 ते रविवार 11 जानेवारी या कालावधीत हा उत्सव होईल. श्री प्रभादेवी मातेचा वार्षिक उत्सव प्रभादेवी आणि दादर परिसरातील मोठा उत्सव मानला जातो. दरवर्षी जत्रोत्सवात विविध खाद्यपदार्थ आणि खरेदीचे स्टॉल्स लागतात. त्यामुळे जत्रोत्सवाला गर्दी असते. या काळात श्री प्रभादेवी मातेचे मंदिर दर्शनासाठी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत खुले राहील. श्री प्रभादेवी माता असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मातेचा वार्षिक उत्सव मुंबईची सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.