प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले हे हिटलरची भूमिका साकारणार आहेत. नाटकावर आधारित हा चित्रपट पुढील वर्षी 1 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ या तीन मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्काराची हॅट्ट्रिक करणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखन केले आहे. प्रशांत दामले यांच्या हस्ते नुकतेच हिटलरच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या भूमिकेबद्दल बोलताना प्रशांत दामले म्हणाले की, मी कुठल्याच अँगलने हिटलर दिसत नाही. हे मला माहिती आहे. म्हणूनच मला हिटलर म्हणून घेतले आहे. असा हिटलर तुम्ही इतिहासात बघितला नसेल. या चित्रपटात पूर्णपणे वेडेपणा भरलेला आहे. हास्याचा धमाका आहे.
View this post on Instagram