
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती पंतप्रधान मोदींची एखादी दुखरी नस लागली आहे. त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत. ट्रम्प यांनी मोदींचे माकड केले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.
मोदी ट्रम्प सांगतील तेच करतात. रशियाकडून तेल खरेदी करायचे नाही, तर करायचे नाही. भारतीय कृषी सेक्टर अमेरिकेसाठी उघडायचे, तर उघडले. आतापर्यंत टेक्स्टाईलवर टॅरिफ 2.5 टक्के होता तो आता 18 टक्के झाला आहे. मोदी यांची दुखरी नस ट्रम्प यांच्या हाती लागली.त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत, असे आंबेडकर म्हणाले.


























































