
इटलीत गांधींच्या पुतळय़ाची विटंबना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱयाआधी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खलिस्तानी समर्थकांनी हिंदुस्थानचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाची तोडपह्ड केली. पुतळय़ाचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर ही तोडपह्ड करण्यात आली. या घटनेनंतर परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी म्हटले की, आम्ही रिपोर्ट पाहिला असून महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाची विटंबना केल्याप्रकरणी आम्ही इटलीच्या अधिकाऱयांकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळय़ाला व्यवस्थित करण्यात आले आहे. यासंबंधी इटलीच्या अधिकाऱयांसोबत चर्चा झाली आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी आज इटली दौऱयावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीत होणाऱया जी 7 शिखर परिषदेसाठी आज रवाना होणार आहेत. जी 7 शिखर परिषदेचे आयोजन इटलीतील अपुलिया येथील बोरगो एग्नाजिया रिसॉर्टमध्ये 13 ते 15 जूनदरम्यान होणार आहे.
18 जूनपासून जम्मू–वैष्णोदेवी हेलिकॉप्टर सेवा
जम्मू येथून वैष्णोदेवी मंदिरात पोचण्यासाठी थेट हेलिकॉप्टर सेवा 18 जूनपासून सुरू होणार आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने ही खुशखबर सोमवारी दिली. जगभरातून मोठया संख्येने भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला येतात. वर्षभरात अंदाजे एक कोटी भाविक त्रिकुटा पर्वतावरील माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतात. त्यांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेतल्याने श्राईन बोर्डाने सांगितले. हेलिकॉप्टरसह अन्य सुविधा पॅकेजच्या स्वरूपात दिल्या जातील.
सोने आणि चांदी पुन्हा महाग
सोने आणि चांदीच्या किंमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 320 रुपयांनी वाढल्यामुळे आता सोन्याची किंमत प्रति तोळा 72 हजार 160 रुपयांवर पोहोचली आहे. तसेच चांदी प्रति किलो 800 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे चांदीची किंमत 91 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 66,150 रुपये तर 24 पॅरेट सोन्याची किंमत 72,160 रुपयांवर पोहोचली आहे.
हमासने इस्रायलचा युद्धबंदीचा प्रस्ताव धुडकावला
अमेरिकेच्या मध्यस्थीने पाठवण्यात आलेला युद्धबंदीचा प्रस्ताव हमासने फेटाळला आहे. गाझा पट्टीतून इस्रायलने सैन्य पूर्णपणे परत घेतले तरच युद्धबंदी होईल, असे हमासने ठणकावले आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवारने इस्रायलसोबत युद्धबंदी प्रस्तावावर मोठी मागणी केली. त्याने कतर येथील कार्यालयातून प्रस्तावाला उत्तर दिले. युद्धबंदीसाठी राफा क्रॉसिंग आणि फिलाडेल्फी कॉरिडॉर येथून इस्रायली सैन्य पूर्णपणे हटवा, अशी त्याची मागणी आहे. यापेक्षा कमी असलेला कुठलाही प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे हमासने सांगितलेय. हमासच्या तावडीतून निरपराध नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्रायलने बचाव मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत इस्रायलने 8 जून रोजी हमासच्या पैदेतील चार नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणले. या कारवाईदरम्यान 270 हून पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. यादरम्यान तीन ओलीस मारले गेल्याचा दावा हमासने केला. युद्धबंदीच्या प्रस्तावात संपूर्ण युद्धबंदी, हमासच्या ताब्यात असणाऱया ओलिसांची सुटका, मृत ओलिसांचे अवशेष परत करणे आणि पॅलेस्टिनी पैद्यांची देवाणघेवाण यासाठी अटी आहेत.
युक्रेनकडे अमेरिकेचे शक्तिशाली मिसाईल
रशिया आणि युक्रेनदरम्यान चाललेल्या युद्धात अमेरिका युव्रेनच्या मदतीला पुन्हा एकदा धावली आहे. रशियाच्या जोरदार हल्ल्यापासून बचावासाठी युव्रेनचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी अमेरिकेने युव्रेनला अत्यंत महागडे असे पेट्रीयट मिसाईल देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे युव्रेनच्या युद्धभूमीत लवकरच आणखी एक पेट्रीयट मिसाईल तैनात होईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युव्रेनमध्ये आणखी एका पेट्रीयट मिसाईल सिस्टिम तैनात करण्यास नुकतीच मंजुरी दिली.