प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढणार, वायनाडमधून मिळाली उमेदवारी

लोकसभा निवडणूकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रायबरेली व वायनाड या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडत रायबरेलीचे खासदार राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रिक्त झालेल्या वायनाड मतदारसंघातून काँग्रेसने प्रियांका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. प्रियांका गांधी या पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.