प्रियांकाने मुलीच्या सुरक्षेसाठी नेमला बॉडीगार्ड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपली मुलगी मालतीच्या सुरक्षेसाठी एक सुरक्षा रक्षक नेमला आहे. मुलगी सुरक्षित आणि संरक्षित राहणे आवश्यक आहे. मी सार्वजनिक जीवन स्वतःहून निवडले आहे, परंतु माझ्या मुलीने तसे केलेले नाही. त्यामुळे ती सदैव सुरक्षित राहावी यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे प्रियांकाने सांगितले.

मुलीच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमताना प्रियांकाने एक चिंताजनक प्रसंगही सांगितला. एकदा तिची मुलगी शाळेतून घरी येत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या मागे येत तिचे रेकार्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर प्रियांका आणि निक जोनस अधिक सावध झाले. त्यानंतर त्यांनी मुलीच्या सुरक्षेसाठी खास सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. सुरक्षा रक्षकांचा उद्देश केवळ प्रसिद्धीपासून तिला दूर ठेवणे नाही तर त्याचबरोबर मुलीच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हेदेखील आहे. परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडीओ काढले जाणे टाळण्यासाठी हा सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याचे प्रियांकाने सांगितले. माझ्या मुलीने शक्य तितके सामान्य आयुष्य जगावे असे वाटते. भविष्यात मालतीला सार्वजनिक जीवनात यायचे की नाही, हा निर्णय तिने स्वतः घ्यावा, असेही प्रियांका म्हणाली.