Photo – ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा भावाच्या लग्नातील पारंपारिक लूक, पाहा फोटो

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा जोनस 23 ऑगस्ट रोजी तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. यावेळी तिने साडी नेसली होती, त्यात ती प्रचंड सुंदर दिसत असून तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. प्रियांकाने मॅचिंग क्रॉप्ड ब्लाऊजसोबत बेरी-पिंक रंगाची कस्टम शिफॉन साडी नेसली होती, तर सोबत तिने इटालियन फॅशन ब्रॅण्ड बुलगारीची ज्वेलरी घातली होती. तसेच तिने मोती, हिरे आणि रूबीने जडलेला विंटेज चोकर नेकलेस गळ्यात घातला होता. यावर प्रियंकाने वायब्रेंण्ट गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली आहे.