मोदींची अवस्था अभ्यास न करता शाळेत गेलल्या मुलासारखी, प्रियंका गांधींचा मोदींना टोला

69
priyanka-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नरेंद्र मोदी यांची अवस्था अभ्यास न करता शाळेत गेलेल्या मुलासारखी झाली आहे, असा टोला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता चांगलाच तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचारी नंबर वन अशी टीका केल्यानंतर प्रियंका गांधी यांनीही त्यांना दुर्योधन असे संबोधले होते.

जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा सांगतात, काय करू, नेहरूंनी माझा कागद घेतला आणि लपवला. इंदिरा गांधींनी मी अभ्यास केलेला कागद घेतला आणि बोट बनवून ती पाण्यात बुडवली अशी उपहासात्मक टीकाही प्रियंका यांनी मोदींना उद्देशून केली. दिल्लीतील एका प्रचारसभेत त्या बोलत होत्या. हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटीच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवून दाखवा

  • काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंमत असेल तर नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे.
  • देशातील तरुणांना जी खोटी आश्वासने दिलीत, त्यांची जी फसवणूक केलीत त्या मुद्दय़ांवर लढून दाखवा असे आव्हान प्रियंका गांधी यांनी मोदींना दिले आहे.
आपली प्रतिक्रिया द्या