डॉ. हेडगेवार हिंदुस्थानचे महान सुपुत्र- प्रणव मुखर्जी

सामना ऑनलाईन । नागपूर

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी आज (गुरुवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत. याआधी त्यांनी आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकास भेट देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांचे स्वागत केले. हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी नोंद वहीमध्ये लिहिलं की, ‘आज मी हिंदुस्थानच्या एका थोर सुपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी येथे आलो आहे.’

प्रणब मुखर्जी यांनी नागपुरात होणाऱ्या संघाच्या कार्यक्रमात जाणे टाळावे असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले होते. परंतु मुखर्जी यांनी मात्र ‘मन की बात’ आता ७ जूनला नागपुरात गेल्यावरच सांगेन,’ असे स्पष्ट केले होते. त्यामुळे काँग्रेस विचारधारेला मानणारे प्रणव मुखर्जी उद्या होणाऱ्या कार्यक्रमात काय बोलणार? कोणती भूमिका मांडणार ? याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

प्रणव मुखर्जींना कन्येचा ‘अॅलर्ट’

आपली प्रतिक्रिया द्या