भायखळा येथे ईदनिमित्त सोयीसुविधा पुरवा! शिवसेनेची पालिकेच्या ई वॉर्डकडे मागणी

ईदनिमित्त भायखळा येथे मुंबई महापालिकेच्या वतीने मुस्लिम बांधवांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या, परिसर स्वच्छ ठेवावा तसेच धूर फवारणी करून लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी शिवसेना उपनेते, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर यांनी मुंबई महापालिकेकडे केली आहे.

मुंबई महापालिकेच्या ई वॉर्ड विभागात बकरी ईदनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जामसुतकर यांनी ही मागणी सहाय्यक आयुक्तांकडे केली. बैठकीवेळी विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक आयुक्तांकडे देण्यात आले तसेच विभागातील विविध विषयांवर आयुक्तांबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभागप्रमुख राम सावंत, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, सहसंघटक सूर्यकांत पाटील, हेमंत कदम, शाखाप्रमुख काका चव्हाण, रमेश रावल, लिंगाप्पा चलवादी, सलीम शेख, महाविकास आघाडीचे गजाला आपा, शबनम आपा, मेहबूब शेख आदी यावेळी उपस्थित होते.