पुणे : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे मंदिरात पंढरपूरवरून आगमन

648

संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पादुका पायी वारी पालखी सोहळ्याचे परंपरेने आळंदी मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. राज्यातील कोरोनाचे प्रादुर्भावाने यावर्षीचा सोहळा अत्यंत साधे पणाने साजरा करण्यात आला. माऊलींच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत झाली. यावर्षी ग्रामस्थांना तसेच भाविकांना हरिभक्त चक्रांकित महाराज यांचे येथून मिळणारा माउलींचा पिठलं – भाकरीचा प्रसाद मात्र कोरोनाचे पार्शवभूमीवर मिळाला नाही.

आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका मंदिरात प्रदक्षिणा करुन श्रींचे संजीवन समाधी जवळ ठेवून आरती झाली . परंपरेप्रमाणे प.पु. चक्रांकित महाराज यांच्या घरुन पिठल-भाकरीचा नैवेद्य श्री ज्ञानेश्वर माऊलींना झाला. दरम्यान पालखी सोहळ्याचे परंपरेने मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप झाले. परंपरेने येथील क्षेत्रोपाध्ये पुजारी सुरेश गांधी,सुधीर गांधी परिवारा तर्फे तसेच ह.भ.प. विष्णु चक्रांकित महाराज परिवारा तर्फे माऊलीना महाप्रसाद नैवेद्य झाला.

आज आळंदीत कमला एकादशी वारीची सांगता ; मंदिर दर्शनास बंद राहणार

पालखी सोहळ्याचे परंपरेतील आषाढ कृष्ण एकादशी अर्थात कमला एकादशी गुरुवारी (दि.16) आळंदीत साधेपणाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार मंदिर भाविकांचे दर्शनास बंद आहे. मात्र मंदिरात वारीचे परंपरेचे कार्यक्रम मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.

आळंदीत दरवर्षी आषाढ वारीची सांगता हजारो भाविकांचे उपस्थितीत होत असते . मात्र यावर्षी वारीवर कोरोंना महामारीचे सावट असल्याने मोजक्याच वारकरी भाविकांचे उपस्थितीत वारी सोहळा परंपरेने साजरा करण्यात आला. आळंदीत आषाढी एकादशीला परिसरातून तसेच सोहळ्यातील दिंड्या व भाविक दर्शनास येत असतात. मात्र यावर्षी गर्दीने फुललेली अलंकापुरी भाविक,वारकरी तसेच आळंदीकर यांना दिसणार नाही. वारकरी भाविकांत या वारीचे विशेष महत्त्व आहे. परंतू कोरोना महामारीचे पाश्र्वभूमीवर जनतेत संसर्ग पसरू नये म्हणून राज्य शासनाने मंदीरे दर्शनास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याचे काळात प्रादुर्भाव जास्त वाढल्याने सर्वांना दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आळंदीत देखील कोरोंना रुग्ण वाढत असल्याने गुरुवारी एकादशी दिनी माऊली पादुका पालखीची नगरप्रदक्षिणा रद्द करण्यात आली आहे. केवळ मंदिरात पादुका मंदिर प्रदक्षिणा होईल. दरम्यान सोहळ्यातील परंपरेने हजेरीचा कार्यक्रम मानकरी,दिंडीकरी यांना नारळ प्रसाद वाटप मांदिरातील मुक्ताई मंडपात होणार असल्याचे वीर यांनी सांगितले. भाविकांनी माऊली मंदिर परिसरात दर्शनास गर्दी करू नये असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे. भाविक,वारकरी यांनी घरी सुरक्षित राहून एकादशी धार्मिक परंपरा जोपासत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर यांनी हातात श्रींचे पादुका घेऊन मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात करीत सोहळा परंपरेने मंदिरात प्रवेशाला. या प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर,राजेंद्र आरफळकर,आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड.विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ अभय टिळक, ह.भ.प. श्रीहरी चक्रांकित महाराज, व्यवस्थापक माउली वीर,मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील,योगीराज कु-हाडे,योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे,विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे,चोपदार अवधूत रणदिवे,श्रीधर सरनाईक, चोपदार राजाभाऊ रंधवे,ज्ञानेश्वर गुळुंजकर यांचेसह मान्यवर दिंडीकरी,वारकरी भाविक उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या