Pune News – मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ

मित्रांसोबत इमारतीखाली खेळत असताना स्विमिंग पूलमध्ये पडून सहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यातील धायरी परिसरात पार्क व्हिव सोसायटीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. निनाद गोसावी असे चिमुकल्याचे नाव आहे.

निनाद सोसायटीच्या आवारात खूप वेळ खेळत होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. म्हणून घरचे त्याला बोलवायला आले तर तो तेथे नव्हता. घरच्यांनी दोन तास मुलाचा शोध घेतल्यानंतर स्विमिंग पूलमध्ये निनाद मृतावस्थेत आढळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.