
खेड तालुक्यातील ग्रामीण भागात बुवाबाजीचे पेव आले आहे. भगवे कपडे घालून भोंदूगिरी करणारे हात बघून भविष्य सांगून ग्रामीण जनतेची फसवणूक करीत असल्याचे समोर येत आहे. अशाच दोन भोंदूंना एका ज्येष्ठ नागरिकाने चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पाईट परिसरातील पाळू गावच्या सावंतवाडीत दोन भोंदूबाबांनी एका महिलेला भुरळ पाडून भविष्याची बतावणी केली. चक्क पाच हजार रुपये उकळल्याची माहिती या महिलेच्या सासऱ्याच्या कानावर पडली. या सासरेबुवांनी भोंदूबांबांना धडा शिकवण्याची तयारी केली. भोंदूबाबा दुचाकीवरून फिरत सावज शोधत असताना रस्त्यात गाठून भोंदूबाबांची धुलाई केली. या भोंदूबाबांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी देताच दोघे गयावया करत होते.





























































