Pimpri Chinchwad Crime News – ऑफीसमधून महिलेचे अपहरण; दोन दिवस गाडीतच डांबले…काय आहे प्रकरण…

पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एक महिलेचे तिच्या ऑफीसमधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिला सातत्याने भुलीचे इंजेक्शन देत गाडीतच डांबून ठेवण्यात आले. अखेर प्रंसगावधान राखत महिलेने कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे या प्रकरणात तिचे अपहरण तिच्या पतीनेच केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना महिलेने दिली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये एका विवाहित महिलेचे भरदिवसा अपहरण करण्यात आले. तिला ऑफिसमधून गाडीपर्यंत तिला फरफटत नेण्यात आले. दोन दिवस तिला सातत्याने भुलीचे इंजेक्शन देत गाडीतचं डांबून ठेवण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महिलेचा पती सुमित शहाणेवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मंचरमधील हे जोडपे असून ऑगस्ट 2023 मध्ये त्या दोघांचे लग्न झाले. मात्र, आठवडाभरात त्यांचे खटके उडू लागले. त्यामुळे महिलेने सुमितपासून लांबच राहणं पसंत केले.

काही दिवसांपूर्वी ती नोकरीसाठी पिंपरी चिंचवडमध्ये आली. तिने एका बांधकाम व्यवसायिकाकडे काम सुरू केले. याची माहिती तिचा पती सुमितला मिळाली. त्याने तिचे ऑफीस गाठत तिला फरफटत आणत गाडीत बसवले. गाडीत सुमितने पत्नीला सातत्याने भुलीचे इंजेक्शन देत होता. त्याने दोन दिवस तिला गाडीतच डांबून ठेवले. ती शुद्धीवर आलयावर तो पुन्हा तिला भुलीचे इंजेक्शन देत होता. अखेर महिलेने प्रसंगावधान राखत सुमितला विश्वासात घेतले. त्याला हव्या असलेल्या कागदपात्रांवर स्वाक्षऱ्या देण्याचे मान्य केले.

सुमितने गाडी मंचर परिसरात आणली. त्यावेळी अधाप भूल उतरली नसल्याने तिने सुमितला सांगितले. त्यामुळे ते एका मंदिरात थांबले. त्यावेळी महिलेने एकाची मदत मागितली. त्याने महिला अडचणीत असल्याचे ओळखले आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सुमतच्या तावडीतून महिलेची सुटका केली. त्यानंतर महिलेने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तिच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.