Pune: पुन्हा Hit and Run; भरधाव कारने महिलेला उडवलं

राज्यात हिट अँड रनची साखळी तुटायच नावचं घेत नाहीय. दिवसेंदिवस नवनवीन अपघातांच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरदिवसा कारचालकाने एका महिलेला जोरदार धडक दिली आहे. कार अंगावर घालून कारचालक तेथून पळून गेला. दररोज होणाऱ्या अपघातावंर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

सदर घटनेचा व्हिडीओ हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुण्यातील पिंपरी गावात भरदिवसा कारचालकाने एका रस्त्याच्याकडेने जाणाऱ्या महिलेला धडक दिली. त्यानंतर कार चालक पसार झाला. यावेळी प्रत्यक्षदर्शींनी त्या व्यक्तीला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग केला. मात्र तो निसटला. हा अपघात इतका भयंकर होती की त्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली आहे. सध्या महिलेवर उपचार सुरू आहेत.

पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच चालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशस मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघातानंतर हिट अँड रनची मालिका सुरूच आहे. मात्र पोलीस प्रशासन यासगळ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.