पुण्यातील परिस्थितीबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री ?

627

पुण्यामध्ये झालेल्या तुफानी पावसामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जनजीवन या पावसाने विस्कळीत केले असून परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी प्रशासन आणि नागरीक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

pune-rain-car-drowned

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे पुण्यात पावसामुळे नागरिकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला आहे.

pune-rain-car-submerged

त्यांनी म्हटले आहे की “पुणे आणि आसपासच्या परिसरात झालेल्या पावसामुळे जिवीतहानी झाल्याचे वृत्त आहे, या जिवीतहानीबद्दल मी खेद व्यक्त करीत आहे. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी जी मदत लागेल ती सगळी केली जाईल. राज्याचा आपात्कालीन व्यवस्थापन विभाग आणि त्यांचा नियंत्रण कक्ष हे सातत्याने पुणे जिल्हाधिकारी आणि पुणे महापालिकेच्या संपर्कात आहे.”

pune-rain-cattle-died

मुख्यमंत्र्यांनी आणखी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की “एनडीआरएफच्या दोन तुकड्या पुण्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दोन तुकड्या या बारामतीमध्येदेखील तैनात करण्यात आल्या आहेत. आणखी एक तुकडी बारामतीच्या दिशेने रवाना झाली आहे. राज्य सरकार धरणातून होणाऱ्या विसर्गावर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.”

pune-rain-damage

pune-rain-ambil-odha

आपली प्रतिक्रिया द्या