पंजाबमधील धक्कादायक घटना, गॅसच्या रांगेत वृद्धाचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलपीजी सिलिंडरच्या तुटवडय़ामुळे देशभरात अनेक ठिकाणी सिलिंडरची काळा बाजारी होत आहे. सिलिंडरसाठी एक किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. बरनाला जिह्यात शैहना गावात दोन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या 66 वर्षीय कुमार मित्तल यांचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला.  या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, गॅस मिळत नसल्याने पंजाबमधील लुधियाना येथे एजंसीच्या गोदामातून लोकांनी चक्क गॅस सिलिंडर पळवून नेले.