
आयपीएलमध्य प्ले ऑफ गाठलेल्या पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसलाय. त्यांचा प्रमुख फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. पंजाबचे सहाय्यक प्रशिक्षक सुनील जोशी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘दुखापतीमुळे चहल दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. त्याची दुखापत संघासाठी मोठा धक्का ठरू शकते.’ कारण दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चहलच्या गैरहजेरीत पंजाबला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात चहलच्या जागी प्रवीण दुबेला संघात संधी देण्यात आली. मात्र, दुबेने दोन षटकांत 20 धावा दिल्या. शिवाय त्याला एकही विकेट टिपता आली नाही. या सामन्यात पंजाबला चहलची उणीव स्पष्टपणे जाणवली. मात्र, त्याच्या दुखापतीचे स्वरूप अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आगामी सामन्यांत तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.