
पंजाबी गायिका सुनांदा शर्माच्या कारची लंडनमध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली. सुनांदा शर्मा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली असून जॅग्वार कारची तोडफोड करण्यात आली आहे. एक महागडी बॅग, हँडबॅग आणि लक्झरी सुटकेस चोरी झाल्याचे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये कारची मागील काच फोडून चोरी केल्याचे स्पष्ट दिसत आहे. लंडनसारख्या शहरात कारची काच फोडून चोरी केल्याची घटना घडल्यामुळे तिने लंडन येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेचा तपास करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.