
पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाविरोधात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांनी शनिवारी बळाचा वापर केला. या हल्ल्याने घाबरलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या महिलेला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी ग्रामस्थांनी श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहीर, उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, तालुका प्रमुख अभिजित जगताप यांनी मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली.
सर्व फोटो – चंद्रकांत पालकर