पुरीतील रथयात्रेची तयारी सुरू!

ओडिशाच्या पुरीमधील जगप्रसिद्ध ‘जगन्नाथ रथयात्रा’ येत्या 27 जूनपासून सुरू होणार आहे. हा उत्सव 9 दिवसांपर्यंत चालतो. या यात्रेची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. भगवान जगन्नाथ, त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या दर्शनासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो लोक येतात.