सरकारी कोट्यातील घराचे आमीष दाखवून 24 कोटींची फसवणूक, पुरूषोत्तम चव्हाण याला अटक

सरकारी कोट्यातून स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवत एका व्यावासायिकासह अनेकांची 24 कोटी 78 लाख रुपयांची फसवणूक करणे अखेर पुरूषोत्तम चव्हाण याला भोवले. आर्थिक गुन्हे शाखेने पुरुषोत्ताम चव्हाण याला आज अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पुरूषोत्तम चव्हाण हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी असून चव्हाणसह अन्य 11 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. सक्तवसुली संचलनालय (ईडी) तपास करीत असलेल्या 263 कोटींच्या प्राप्तिकर गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासा दरम्यान या फसवणुकीची माहिती समोर आली होती.

त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने तपास करून फेब्रुवारी महिन्यात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व तो आपल्याकडे तपासासाठी वर्ग केला होता. तपासात पुरूषोत्तम चव्हाण याने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी चव्हाण याला अटक केली.

चव्हाण याच्यासह प्रसाद देसाई, संजय पाटील, गणेश पाटील, दीपक मोरे, एन.डी. निर्मले. गोविंद सावंत, शशांक लिमये, यशवंत पवार, सह दुय्यम अधिकारी (खरा अथवा तोतया अधिकारी) व कागदपत्रे बनवण्यास प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.