‘पुष्पा द राईज’ या सिनेमाच्या दमदार यशानंतर चाहते सिनेमाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र त्यांची प्रतिक्षा संपली आहे. अल्लू अर्जुनची मोस्ट अवेटेड फिल्म् ‘पुष्पा 2’ याच वर्षी पडद्यावर 6 डिसेंबरला झळकणार आहे. मात्र रिलीज होण्याच्या कित्येक महिने आधी सिनेमाचे ओटीटी राइट्स विकले गेले आहेत आणि ‘पुष्पा 2’ ने या करारासोबत आपले पैसे वसुल केले आहेत.
‘पुष्पा 2’ चे ओटीटी राईट्स डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने ते खरेदी केले आहेत. सिनेनिर्माते आणि नेटफ्लिक्समध्ये कोट्यावधींचा करार झाला आहे. आकाशवाणीच्या वृत्तानुसार नेटफ्लिक्सने अल्लू अर्जुन स्टाररच्या मोस्ट अवेचेड सिक्वल फिल्मसाठी मेकर्सला 270 कोटी रुपये दिले आहेत. यामुळे ‘पुष्पा 2’ डिजिटल राईट्सच्या प्रकरणात सगळ्यात महागड्या हिंदुस्थाने सिनेमांच्या यादीत सहभागी झाला आहे. ‘पुष्पा 2’ ने 270 कोटी ओटीटी राइट्स विकून सिनेमाचा अर्धा बजेट काढला आहे. तर अनेक मीडिया वृत्तानुसार, सिनेमाचे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे.
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ ओटीटीवर विकण्यात आलेला चौथा हिंदुस्थानी सिनेमा बनलेला आहे. याआधी तिसऱ्या नंबरवर केजीएफ चॅप्टर-2 आहे. ज्याचे राईट्स प्राईम व्हिडीओेने 320 कोटी रुपयांना खरेदी केले होते. दुसऱ्या नंबरवर सिनेमा ‘कल्कि 2898 एडी’ आहे. प्रभासच्या सिनेमाला दोन ओटीटी प्लॅटफॉर्मने नेटफ्लिक्स (175 कोटी) आणि प्राईम व्हिडीओ (200 कोटी) मिळून 375 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तर पहिल्या क्रमांकावर आरआरआर सिनेमा आहे. ज्याचे राइट्स नेटफ्लिक्स, जी5 आणि हॉटस्टारने 385 कोटींना खरेदी केले होते.