कतार सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील सर्वात महागडे गिफ्ट, 3,400 कोटींचे लक्झरी बोइंग जंबो जेट देणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगातील सर्वात महागडे गिफ्ट मिळणार आहे. कतार सरकार ट्रम्प यांना लक्झरी बोईंग 747-8 जम्बो जेट देणार आहे. या विमानाची किंमत तब्बल 400 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 3 हजार 400 कोटी रुपये आहे. ट्रम्प हे मंगळवारपासून कतार दौऱयावर जात आहेत. तेव्हा अधिकृतरीत्या याची घोषणा होऊ शकते. 2029 मध्ये ट्रम्प यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी या विमानाचा ते वापर करू शकतील. ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही ते या विमानाचा वापर करू शकतील. सध्या ट्रम्प खासगी विमान ट्रम्प पर्ह्स वन या विमानाचा वापर करत आहेत. हे त्यांचे जुने 757 जेट असून ते 1990 मधील आहे. 2011 मध्ये ते खरेदी करण्यात आले होते.

ट्रम्प यांनी दोन बोईंग विमानांचा सौदा केला होता ट्रम्प यांनी दोन बोईंग 747 विमानांना अत्याधुनिक बनवण्यासाठी सौदा केला होता. एअर पर्ह्स वन विमान म्हणून त्यांचा वापर करण्यात येणार होता, परंतु वारंवार दिरंगाई झाल्याने या विमानांचे बजेट दोन बिलियन डॉलरहून अधिक झाले. बोईंग पंपनीने सांगितले की, या विमानांची डिलिव्हरी 2027 पर्यंत होऊ शकते. ट्रम्प यामुळे नाराज झाले आणि इतर पर्यायांवर विचार करण्याचा निर्णय घेतला.