वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था! विखेंची भावनिक पोस्ट, रोख कुणाकडे?

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शिक्षक पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. चार जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे रिंगणात उतरले होतो, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यानंतर राजेंद्र विखेल यांनी आपल्या मनातील खदखद फेसबुक पोस्टद्वारे मांडली आहे. त्यामुळे त्यांना माघार घेण्यास भाग कोणी पाडले? त्याचा रोख कोणाकडे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच यावर राधाकृष्ण विखे-पाटील काय प्रतिक्रिया देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर राजेंद्र विखे यांनी केलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एक शायरी लिहिली असून यातून अगदी सूचक असा संदेश दिला आहे. “शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोका खा गया, वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था!”, असे त्यांनी यात म्हटले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात विधान परिषदेसाठी 21 उमेदवार जण रिंगणात उरले आहेत. तब्बल 15 जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. येत्या 26 जूनला ही निवडणूक पार पडणार आहे. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून विवेक कोल्हे, अप्पासाहेब शिंदे व भाऊसाहेब कचरे यांच्यासह तब्बल नऊ नगरकरांनी अर्ज भरलेला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अॅड. संदीप गुळवे यांना मैदानात उतरवले आहे

काय आहे विखे यांची शायरी

राजेंद्र विखे-पाटील यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. “शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोका खा गया; वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था!” असे यात म्हटले गेले आहे. वास्तविक पाहता अशा पद्धतीची पोस्ट राजेंद्र विखे यांनी का केली? कशासाठी केली? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर दुसरीकडे सुजय विखे यांचा पराभव झाल्यानंतर राजेंद्र विखे ही निवडणूक लढतील असे अनेकांना वाटले होते. मात्र त्यांना माघार घ्यावी लागली.