
हरयाणातील राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्याच वडिलांनी निर्घृणपणे हत्या केली. गोळ्या घालून राधिकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरण पोलिसांनी राधिकाच्या वडिलांना अटक केली. राधिकाही हत्या होऊन चार दिवस उलटले असून रोज नवनवीन खुलासे आहेत. आताही राधिकाची मैत्रिण हिमांशिका सिंह हिने एक व्हिडीओ जाहीर करत धक्कादायक दावा केला आहे. तीन दिवसांपूर्वीच राधिकाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा हिमांशिका हिने केला आहे.
राधिका हिच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबाला भेटायला गेले तेव्हा कळले की गेल्या तीन दिवसांपासून तिच्या हत्येचा कट रचला जात होता. 10 जुलै रोजी मी वर्कआऊट करत असताना माझ्या मैत्रिणीचा फोन येतो. पण मी व्यस्त असल्याने फोन उचलू शकत नाही. त्यानंतर मी एक बातमी पाहते. त्यात असे लिहिले होते की, राधिकाची तिच्या वडिलांनी हत्या केली. आधी मला वाटले ही माझी मैत्रिण राधिका नसेल. मी राधिकाला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. तेव्हाच मी काय ते समजून गेले. माझ्या पायाखालची जमीन सरकली.
त्यानंतर मी राधिकाच्या बहिणीला फोन केला तेव्हा या घटनेची माहिती मिळारी. राधिकाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा मला कळले की तिचे वडील गेल्या तीन दिवसांपासून तिला मारण्याचा कट रचच होते. याच उद्देशाने त्यांनी पिस्तूल मागवली होती. हत्येपूर्वी राधिकाच्या भावाला जाणूनबुजून घराबाहेर पाठवण्यात आले, तिच्या आईला दुसऱ्या खोलीत बंद करण्यात आले, असेही हिमांशिकाने सांगितले.
राधिकाची हत्या करताना तिला कुणीही वाचवू शकणार नाही याची पूर्ण काळजी तिच्या वडिलांनी घेतली होती. यासाठी त्यांनी राधिकाच्या पाळीव कुत्र्यालाही बाहेर ठेवले. त्यानंतर संधी मिळताच राधिकावर गोळ्या झाडल्या. कोणता बाप मुलीवर 5 गोळ्या चालवतो? तिने असे काय केले होते? असा सवालही हिमांशिकाने केला.