अन्यायाविरूद्धच्या लढाईत देश तुमच्यासोबत, राहुल गांधी यांनी केजरीवालांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस आहे. अरविंद केजरीवाल 56 वर्षांचे झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर खास पोस्ट शेअर करत अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुल गांधी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर लिहीले की, आशा करतो की तुम्ही निरोगी आणि आनंदी राहा. अन्यायाविरुद्धच्या या लढतीत देश तुमच्यासोबत आहे.

आपच्या कार्यकत्यांनी तिहार तुरुंगाच्या बाहेर संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा केला. अनेक कार्यकर्ते एकत्र जमून त्यांनी केजरीवाल यांच्या फोटोसमोर केक कापला आणि एकमेकांना भरवला.