
‘आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मदतीने आसाममध्ये ते ‘लॅण्ड एटीएम’ चालवत असून सर्वसामान्य लोकांची जमीन हिसकावून उद्योगपतींना देत आहेत,’ असा जोरदार हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चढवला.


























































