Baramati Plane Crash – अत्यंत वेदनादायक, अजित पवार यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांचे आज झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायक असल्याची भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.

या दु:खद प्रसंगी आपण महाराष्ट्रातील जनतेसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच या कठीण काळात पवार कुटुंबीय आणि त्यांच्या सर्व निकटवर्तीयांप्रती त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त केल्या.

विमान अपघातात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.