काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एका कॅब चालकासोबत प्रवास करत त्यांच्या समम्या जाणून घेतल्या. त्यांच्या या प्रवासाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘कॅब चालक, टॅक्सी चालक, रिक्षा चालकांसारख्या असंघटीत कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबत एक कायदा काँग्रेससाशित राज्यांमध्ये केला जाणार असल्याचे या व्हिडीओत राहुल गांधी यांनी सांगितले आहे. हे कायदे तयार करण्यापूर्वी कॅब चालकांना होणाऱ्या त्रासाची माहिती घेतल्याचे राहुल यांनी सांगितले. हा व्हिडीओ पोस्ट करतानाच राहुल गांधी यांनी वाढलेल्या महागाईवरून सरकारवर टीका केली
आमदनी कम और महंगाई से निकलता दम – ये है भारत के gig workers की व्यथा!
सुनील उपाध्याय जी के साथ एक Uber यात्रा के दौरान चर्चा में और फिर उनके परिवार से मिल कर देश के Cab drivers और Delivery agents जैसे gig workers की समस्याओं का जायज़ा लिया।
‘हैंड टू माउथ इनकम’ में इनका गुज़ारा… pic.twitter.com/46y9o1Iul8
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 19, 2024
‘आमदनी कम और महंगाई से निकलता दम. ही आहे सध्या देशातल्या असंघटीत कामगारांची व्यथा. सुनील उपाध्याय या उबेर ड्रायव्हरसोबत प्रवास करताना त्यांच्या परिवाराविषयी व देशातील कॅब ड्रायव्हर, डिलिव्हरी एजंट्ससारख्या असंघटित कामागारांच्या समस्यांची माहिती घेतली. हातावर पोट असलेल्या या कामगारांचे सध्याच्या महागाईमुळे मोठ्या कष्टाने उदरनिर्वाह होत आहे. त्यांच्या व त्यांच्या परिवारासाठी कोणत्याही प्रकारची बचत राहत नाही. यांच्यासाठी काँग्रेसचे राज्य असलेली सरकार काही ठोस धोरणं बनवून त्याना न्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि इंडिया आघाडी सर्वप्रकार लढा देऊन अशा प्रकार असंघटीत कामगारांना न्याय देण्याासठी देशभर लढा देईल”, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत ते उबेर ड्रायव्हर असलेल्या सुनील उपाध्याय यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. त्यात ते उबेर ड्रायव्हरच्या समस्या, त्यांच्या मिळकतीविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्यांनी उपाध्याय यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली