तुमची शिकवणच माझ्यासाठी…. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल यांची भावनिक पोस्ट

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 80 वी जयंती असून त्यांचा मुलगा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वडिलांसाठी सोशल मीडिया साईट एक्सवर खास भावनिक पोस्ट शेअर करत पप्पा, तुमची शिकवणच माझ्यासाठी प्रेरणा असल्याचे म्हटले आहे. यावेळी दिल्लीच्या वीरभूमीत पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मलिल्कार्जुन खरगेही त्यांच्यासोबत होते.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “एक करुणामय व्यक्तिमत्व, सौहार्द व सद्भावनेचं प्रतीक”, अशा शब्दांत राहुल गांधींनी आपल्या वडिलांसाठी भावना पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत.  तुमची शिकवणच माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि हिंदुस्थानसाठी तुम्ही पाहिलेली स्वप्ने माझी आहेत. मी ती पूर्ण करणार. तुमच्या आठवमींना सोबत घेऊन चालेन. यावेळी राहुल गांधी यांनी दिल्लीच्या वीरभूमीत पोहोचून राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.