राहुल वैद्यने तुर्कीतील 50 लाखांची ऑफर नाकारली

प्रसिद्ध गायक राहुल वैद्यने तुर्कस्तानात कार्यक्रम करण्यासाठी दिली गेलेली 50 लाखांची ऑफर नाकारली आहे. पाकिस्तानविरोधाच्या लढाईवेळी तुर्कीने हिंदुस्थानऐवजी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून तुर्कीवरील बहिष्कार वाढत आहे. देशापेक्षा काहीही मोठे नाही, असे सांगत राहुल वैद्यने ही ऑफर नाकारली आहे. तुर्कीत 5 जुलैला एका लग्नसमारंभात सादरीकरण करण्यासाठी 50 लाखांची ऑफर राहुल वैद्यला देण्यात आली होती. कोणतेही काम, पैसा आणि प्रसिद्धी देशाच्या हितापेक्षा मोठी असू शकत नाही, असे राहुलने म्हटले आहे.