नागपूर-मुंबई, पुणे वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच

नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण झाली आहे. अंतिम अहवाल प्राप्त होताच नागपूर-पुणे-नागपूर तसेच नागपूर-मुंबईदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा किमान एक ते दीड तासांचा वेळ वाचणार आहे. पुण्याहून सद्यस्थितीत तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. नागपूर-पुणे-नागपूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय झाला असतानाही अद्याप सुरू झाली नसल्याने झालेल्या बैठकीत खासदारांनी याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.